धाराशिवच्या तुळजापूरमध्ये रस्त्याच्या कामावरून दोन गटांत मोठा वाद झाला. यामध्ये कोयते आणि गोळीबार झाल्याची माहिती आहे, ज्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. घटनेस्थळी बंदुकीची गोळी सापडल्याने गोळीबाराला दुजोरा मिळाला. नगरपालिका निवडणूक निकालापूर्वी घडलेल्या या घटनेने तुळजापूरमध्ये तणाव निर्माण झाला असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.