धाराशिवच्या जिल्ह्यात काही भागांमध्ये शंखी गोगलगायी मुळे शेतकरी हैराण झालेत. रात्रीच्या अंधारात सोयाबीन पिकावर गोगलगाय हल्ला करते. त्यामुळे दुबार पेरणी करून देखील पीक उध्वस्त झालं आहे. पिक वाचवण्यासाठी मुला बाळांना सोबत घेऊन शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.