जळगाव जिल्ह्यातील धरणगांवात एका भरधाव टँकर चालकाचे नियंत्रण सुटले. मालवाहतूक वाहनाला कट मारल्याने टँकर थेट रस्ता ओलांडून रॉंगसाईडच्या नाल्यात शिरला. सुदैवाने, दोन मोटारसायकल चालक आणि मालवाहतूक चालक बालंबाल बचावले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अपघातातून चालक बचावला, मात्र भीतीने तो घटनास्थळावरून फरार झाला.