मुंबई-आग्रा महामार्गावरील बिजासन घाटात पिकअप-दुचाकी अपघातात आई-मुलगा जखमी झाले. पपईने भरलेल्या पिकअपची दुचाकीला धडक बसून ती पलटी झाली. रस्त्यावर पपई विखुरल्याने वाहतूक विस्कळीत झाली. यावेळी नागरिकांनी पपई गोळा करण्यासाठी मोठी गर्दी केली. पोलिसांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले असून, अपघातातील चालक फरार आहे.