गेल्या चार दिवसापासून धुळे जिल्ह्यात हवामानात बदल झाला आहे. थंडी वाढली असून तापमान कमी झाला आहे. या वातावरण आणि धुक्यामुळे पालेभाज्यांवर रोगराई पसरली आहे. कोबी पिकांवर मर रोग आला असून अचानक रोप जळू लागली आहेत. त्यावर कीड पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून फवारणी केली जात आहे. होणाऱ्या नुकसानासाठी कृषी खात्याने मार्गदर्शन करावे असे देखील म्हटले जात आहे.