पेट्रोल - डिझेल आणि सीएनजी किंमतीत वाढ झाल्यानंतर आता धुळ्यातील रिक्षा चालकांनी दहा ते पंधरा रुपयाची भाडे वाढ केली आहे. पंधरा दिवसांमध्ये तब्बल पेट्रोलच्या किमतीमध्ये अकरा रुपये वाढ झाल्याने ही भाडेवाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल बरोबर वाहनात लागणारा गॅस देखील महाग झाला आहे त्यामुळे रिक्षा चालवणं परवडत नाही. त्यामुळे या रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती कमी कराव्यात अशी अपेक्षा रिक्षा चालकांनी व्यक्त केली आहे.