बिबट्यांच्या संकटाकडे वन विभाग डोळेझाकपणा करत असल्यामुळे धुळ्यातील संतप्त ग्रामस्थांनी मुंबई आग्रा महामार्ग अर्धा तास अडवून धरत रास्ता रोको केला. थैमान घालणाऱ्या बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी रास्ता रोको दरम्यान केली आहे. रास्ता रोको दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला.