धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील जामखेडी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरल्याने धरणातून ७७० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने हा विसर्ग करण्यात येत आहे.