धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ७४ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरात सहा ठिकाणी निवडणूक कार्यालये उघडण्यात आली आहेत. महाआघाडी आणि महायुतीच्या निर्णयाचा सस्पेन्स कायम असल्याने, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात गर्दी होण्याची शक्यता आहे.