यंदा धुळे जिल्ह्यात कपाशी पेक्षा जास्त प्रमाणात मका या पिकाची लागवड झाली आहे. मका पीक हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड झाली असली तरी या मका पिकावर सध्या वातावरणामुळे लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.