माजी आमदार फारूक शहा यांच्या पुढाकाराने आज धुळे शहरात एका भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.या विवाह सोहळ्याला मंत्री माणिकराव कोकाटे यांनी धावती भेट देऊन वधूवरांना शुभेच्छा दिल्या. यावेळी २२ जोडपी विवाहबंधनात अडकली.या संपूर्ण विवाह सोहळ्याचा खर्च फारूक शहा यांनी वैयक्तिकरित्या उचलला आहे.