धुळे महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या मायादेवी परदेशी तर उपमहापौर पदी भाजपाच्या ज्योत्स्ना पाटील यांची निवड झाल्यानंतर त्यांची मोठी मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली. यावेळी मंत्री जयकुमार रावळ आणि आमदार अनुप अग्रवाल यांनी महापौर उपमहापौर यांचे स्वागत केलं निवड झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालिके बाहेर जल्लोष केला, फटाक्याची आतिशबाजी करत ढोल ताशाच्या आणि डीजेच्या तालावर ही मिरवणूक निघाली.