जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीसाठी काटकसर आणि आर्थिक स्वावलंबनाविषयी आवाहन केले होते. त्यानुसार धुळे महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चाने इलेक्ट्रिक बाईक खरेदी करून त्यांचा वापर सुरू केला. पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज ई बाईकवर शहरात फेरफटका मारला.