धुळे महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ निर्माण झाला आहे. अनेक नागरिकांसह नगरसेवकांचे नाव वेगळ्या प्रभागात गेल्याने हरकतीचा पाऊसच पडला आहे. अवघ्या आठवडाभरामध्ये तब्बल 28 हजार हरकती महापालिकेत प्राप्त झालेल्या आहेत.