धुळे शहरात कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या मॉडिफाय बुलेट सायलेन्सर आणि फॅन्सी नंबर प्लेट्सविरोधात धुळे पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ६५ बुलेट मोटारसायकली जप्त केल्या. या बुलेटवरील अवैध सायलेन्सर काढून ते रोड रोलरखाली दाबून अक्षरशः भंगारात काढण्यात आले. शहर वाहतूक नियंत्रक शाखेच्या पथकाने संतोषी माता चौकात ही कारवाई झाल्यावर फटाक्यांचा आवाज काढणारे सायलेंसर लावून फिरणाऱ्या आणि कर्कश आवाज काढणाऱ्या त्याचबरोबर फॅन्सी नंबर प्लेटवर पोलिसांनी कारवाई केली.