धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळे तालुक्यातील बोरीस येथील सती देवी यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. या यात्रेनिमित्त हजारो भाविक हे नवस पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी हजेरी लावतात. या ठिकाणी विविध गावातून पाळणे खेळणे त्याचबरोबर विविध दुकाने टाकली जात आहे. यात्रोत्सवानिमित्त खानदेशातील कुस्तीपटूंना प्रेरणा मिळावी म्हणून कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कुस्ती स्पर्धेमध्ये तब्बल 500 मल्लांनी सहभाग नोंदविला होता. विजयी झालेल्या मल्लांना सती देवी यात्रा उत्सव समितीच्या वतीने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब गिरासे यांच्या हस्ते भांड्यांचे वाटप ठेवण्यात आले.