दरवर्षी साधारणपणे ७ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होत असते. मात्र यंदा पावसाने उशीर केल्याने धुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत होते. वेळेत पाऊस न झाल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या होत्या आणि दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र 22 जूननंतर शिंदखेडा तालुक्यात भागांत समाधानकारक पावसाची सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. विशेषतः शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातील अनेक गावांमध्ये चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.