धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी ज्वारीची आवक वाढली आहे. दररोज साधारण 700 ते 1000 क्विंटल ज्वारी विक्रीस येऊ लागली असून धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा साखरी शिरपूरसह जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, अमळनेर , पारोळा येथील शेतकरी आपली ज्वारी विक्रीस आणत आहेत. ज्वारीला मात्र अवघा अठराशे ते 2200 भाव भेटत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.