धुळे : पाऊस लांबल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरात झाला आहे. भाजीपाल्याचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत 20 रुपयांनी वाढले आहेत. अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने भाजीपाल्याचे दर प्रति किलो 20 रुपयांनी वाढले असून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.. पाऊस नसल्याने भाजीपाल्याची आवक घटली आहे. गेल्या आठवड्यामध्ये 40 ते 50 रुपये किलो मिळणारा भाजीपाला आता 70 ते 80 रुपये किलो झाला आहे.