गेल्या अनेक दिवसापासून गावात स्वच्छ पाणी मिळत नसल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे स्वच्छ पाण्यासाठी टाकीवर चढून कापडणे ग्रामस्थांनी आज शोले स्टाईल आंदोलन केले. 15 ऑगस्टपूर्वी स्वच्छ पाणी मिळावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.