धुळे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे साखरी तालुक्यातील प्रमुख तीन धरणे शंभर टक्के भरली आहेत. या धरणांचे पाणी अक्कलपाडा धरणात आले आहे त्यामुळे अक्कलपाडा धरण देखील येत्या काही दिवसात भरणार आहे. आता प्रशासनाच्या वतीने अक्कलपाडा धरणाचे तीन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून पांजरा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले आहे.