जळगावच्या जामनेरमध्ये पेट्रोल पंपावर पोलिस बंदोबस्तात शेतकऱ्यांना डिझेलचे वितरण करण्यात येत आहे. पेट्रोल पंपावर गर्दी होऊन गोधळ उडत असल्याने पोलिस बंदोबस्तात डिझेल वाटप होत आहे. केवळ शेतकऱ्यांनाच डिझेलचे वितरण केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.