धाराशिव जिल्ह्यात वाशी आणि कळंब परिसरामध्ये गेले तीन दिवसापासून डिझेलची टंचाई आहे. पेट्रोल पंपावर डिझेल संपले असे लिहिलेले बोर्ड लागले आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शेतातील कामे झाली ठप्प झाली आहेत. डिझेलच्या टंचाईमुळे दळणवळण ही विस्कळीत झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.