पुणे : सह्याद्रीच्या कुशीत मुसळधार पाऊस कोसळत असतानाही भिमाशंकर आणि कोंढवळ परिसर आजही भीषण पाणीटंचाईने होरपळत आहे. यावर कायमस्वरूपी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दुर्गम डोंगरकड्यांवरून दुचाकीवर प्रवास करत कोंढवळ अभयारण्यात प्रस्तावित बंधाऱ्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.