सह्याद्रीच्या पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे डिंभे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे घोड नदीपात्रात ४८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून पावसाचा जोर वाढल्यास विसर्गात वाढ होऊ शकते.