पंढरपूरच्या वारीत सर्वत्र भगव्या पताका आणि भगवी पथके पाहायला मिळतात. मात्र संत कबीर महाराजांच्या दिंडीचे वैशिष्ट्य काही वेगळेच आहे. काशी विश्वेश्वर अर्थात भगवान शंकरांनी कबीर महाराजांना पंढरीच्या वारीसाठी प्रतीक म्हणून पांढरा झेंडा दिल्याची आख्यायिका आहे. हीच परंपरा आजही जपली जात असून कबीर महाराजांच्या दिंडीत पांढऱ्या पताकांचा समावेश असतो. पांढरा रंग शांती, पवित्रता आणि समतेचे प्रतीक मानला जातो.