जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, यावल परिसरात शेतकऱ्यांनी केलेली पपई लागवड सध्या मोठ्या संकटात सापडली आहे. पपईवर व्हायरसजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली असून बाजारात भाव कोसळले आहेत. सध्या शेतकरी पपई अवघ्या ७ रुपये दराने व्यापाऱ्यांना विकत आहेत.