धुळे जिल्ह्यात यांना मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गव्हाची पेरणी केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्याचबरोबर धुकंदेखील पसरलं आहे. त्याचा परिणाम रब्बी पिकांवर होत असून सर्वाधिक गव्हावर त्याचा परिणाम झाला आहे.