यंदा जलस्तर चांगला असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने मका, ज्वारी आणि कांदा लागवडीला पसंती दिली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे या पिकांवर आता रोगाचे सावट निर्माण झाले असून, बळीराजा चांगलाच धास्तावला आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्याने पिके पिवळी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.