पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांचं पार्थिव अहिल्यानगरमधील मोहोज देवढे गावात दाखल झालं आहे. पती अनंत गर्जे यांच्या घरासमोर अंत्यसंस्कार करण्याची मागणी गौरीच्या माहेरच्या मंडळींनी केली आहे. यामुळे मोहोज देवढे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. गर्जे आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची सुरू झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.