बुलढाणा जिल्ह्यातील जागतिक दर्जाच्या लोणार येतील खाऱ्या पाण्याच्या सरोवरातील वाढती जलपातळी चिंतेचा विषय ठरत असताना, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी तातडीने हस्तक्षेप केला आहे.. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून याचिका दाखल करून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह लोणार सरोवर परिसराची पाहणी केली.. पाहणीदरम्यान विराज धारातीर्थ आणि रामगया येथून मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्याचा प्रवाह आढळून आल्याने, हे पाणी लिफ्टिंग करून जलपातळी नियंत्रणात ठेवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.. यानुसार वन्यजीव विभाग, महसूल आणि नगरपालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे.. लोणार सरोवराचे पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी प्रशासनाचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे..