"कोणाला मुख्यमंत्री व्हायचंय? हे बघा.. चांगलं शिकलात, मोठे झालात तर कोणीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बनू शकतो. मंत्री, खासदार आणि आमदारही होऊ शकतो. पण सगळे तिकडे जाऊ नका, मग आमचं काय होणार," अशी मस्करी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. शाळेतल्या विद्यार्थ्यांशी ते बोलत होते.