पावसापासून आसरा घेण्यासाठी सोसायटीत बसलेल्या कुत्र्याला बॅटने मारहाण केल्याची घटना उल्हासनगरातील कॅम्प चार येथील शिवलीला रेसिडन्सी येथे घडली आहे. या कुत्र्याला मारहाण करणारा CCTV मध्ये कैद झाला असून उल्हासनगरातील प्राणीप्रेमींमध्ये यामुळे संताप व्यक्त होत आहे.