आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मावळ तालुक्यातील शिरगाव येथे एक अनोखा योग सोहळा पाहायला मिळाला. प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगावातील एका सोसायटीत योगसाधनेसाठी जमलेल्या नागरिकांसोबत एका श्वानानेही योगासनांमध्ये सहभाग घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.