औंध येथे श्री यमाई देवी यात्रेनिमित्त श्वान शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र कर्नाटक सह राज्यातील 110 नामांकित ग्रेहाऊंड श्वान शर्यतीत सहभागी झाले होते. यात नर आणि मादी श्वानांचा सहभाग होता. या स्पर्धेत वाई येथील सुरेश वाडकर यांची वारसदार 24 श्वान यमाई केसरी या किताबासह दहा हजार रुपये रोख रक्कम आणि आकर्षक भव्य चषक जिंकून पहिल्या क्रमांकाची मानकरी ठरली.