दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पंढरपूर पोलिसांनी शहरात नाकेबंदी केलीआहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. विठ्ठल मंदिराच्या चारही बाजूंना पोलीस तैनात करण्यात आले आहेत. विठ्ठल मंदिरात प्रत्येक तासाला डॉग स्क्वाडच्या माध्यमातून मंदिराचा कोपरा अन कोपरा सध्या चेक केला जात आहे. तर प्रत्येक भाविकाला तपासणी करूनच विठ्ठल मंदिरात प्रवेश दिला जात आहे.