मुंबईतील वरळी इथल्या समुद्रात डॉल्फीन दिसले. वरळी सीफेस इथल्या समुद्रात डॉल्फीनचं दर्शन झालं. डॉल्फीन सामान्यत: खोल समुद्रात आढळतात, परंतु ते अनेकदा वांद्रे-वरळी सी-लिंकजवळ किंवा वरळी सी फेसजवळही पहायला मिळतात. याठिकाणी प्रामुख्याने हंपबॅक डॉल्फीन दिसतात. याआधीही सी फेसजवळ डॉल्फीन दिसल्याच्या घटना घडल्या आहेत.