डोंबिवलीतील खंबाळपाड्यात महानगर गॅस पाईपलाईन लिकेज झाली आहे. यामुळे मॉडेल कॉलेज परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले होते. परिसरात गॅसचा तीव्र वास येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.