नाशिकच्या कळवण,सटाणा व सुरगाणासह आदिवासी बहुल पाड्यावर डोंगऱ्या देव उत्सवाची धूम सुरु आहे.कळवणच्या तीळगव्हाण, कन्हेरवाडी देवळीकराड तिरळ खोऱ्यासह तालुक्यात डोंगऱ्या देव उत्साहाला प्रारंभ झाला असून, गावाच्या चौकात रोवलेल्या खुंटाभोवती आदिवासी बांधव फेर धरून पावरी,खुळखुळ्याची काठी,बाबूंपासून बनविलेल्या टपऱ्या तालावर डोंगर देव रं आम्हाना डोंगर देव रं,डोंगऱ्या देवाला उपास करसु रं आम्ही कोकणी व्ह आदिवासी स्वयंरचित आदिवासी गीते गाऊन आनंदोत्सव साजरा करीत आहे.