महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या नगरीत दरवर्षी पौष पौर्णिमेला पारंपरिक पद्धतीने गाढवांचा बाजार भरत असतो. यावर्षी गुजरात मधील अमरेली भागातून 90 गाढवे विक्रीसाठी आली होती. बाजार भरण्यापूर्वी या गाढवांची विक्री झाली. 50 हजार रुपयांपासून ते एक लाख रुपये प्रमाणे एका एका गाढवाची विक्री झाली. जेजुरी येथील बंगाली पटांगणात सुमारे चारशे ते पाचशे गावठी गाढवे विक्रीसाठी आली असून पांचिवस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत या गाढवांची किंमत होती.