काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी एकाच जागेवर अनेक जण इच्छुक असल्यामुळे इच्छुकांची समजूत काढताना नेत्यांचीही दमछाक होत आहे. दरम्यान काँग्रेस नेते, आमदार सतेज पाटील यांनी उमेदवारी देता आली नाही तर नाराज होऊ नका तुम्हाला विधानसभेची उमेदवारी देतो असं वक्तव्य मुलाखत देण्यासाठी आलेल्या इच्छुकांसमोर केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर इच्छुकांमध्ये एकच हशा पिकला.