भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी साल 1926 जळगावच्या आसोदा या गावाला भेट दिली होती. राज्यात प्रथमच धनजी रामचंद्र बिऱ्हाडे ही दलित व्यक्ती जनरलमधून सरपंच म्हणून आसोदा येथे निवडली गेली होती. त्यामुळे बाबासाहेबांनी खास या गावाला आर्वजून भेट देत तीन दिवस मुक्काम केला होता. त्याच्या आठवणी गावकऱ्यांनी जागवल्या आहेत.