पावसाळा तोंडावर आल्याने यवतमाळ शहरातील नाल्यांच्या सफाई कामांना अखेर वेग आला आहे. अनेक भागांतील तुंबलेले आणि गाळाने भरलेले नाले गेल्या अनेक दिवसांपासून जैसे थे स्थितीत होते. यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी आणि पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या निर्माण होण्याची भीती होती.