महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारी साताऱ्यातील बावधन गावची बगाड यात्रा आज मोठ्या उत्साहात पार पडत आहे. यावर्षी बगाडाचा बगाड्या होण्याचा मान विठ्ठल कदम यांना मिळाला आहे. मागील सोळा वर्षांपूर्वी आपल्या भावाची तब्येत स्वास्थ्यासाठी त्यांनी नाथांना नवस बोलला होता. या नवसपूर्ती निमित्त त्यांना हा मान मिळाला आहे.