गेल्या आठ दिवसांपासून साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र वाशिम जिल्ह्यात पाहायला मिळत होते. किरकोळ बाजारात साखरेचा दर थेट ८० रुपयांपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसला होता. मात्र आता साखरेच्या दरात अचानक घसरण झाली असून, सध्या जिल्ह्यात ६४ ते ६७ रुपये किलो दराने साखर विकली जात आहे.