वाशिम जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, त्याचा फटका आता खरीप पिकांनाही बसत आहे. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांत पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामात पेरणी केलेली ज्वारी करपून गेल्याचे चित्र वाशिमच्या झाकलवाडी परिसरात पाहायला मिळत आहे.