वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा अंदाज लक्षात घेता जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकरी हरभरा काढणीसाठी धावपळ करताना दिसत आहेत. अचानक पावसाची शक्यता असल्याने पिकांचे नुकसान टाळण्यासाठी अनेक शेतकरी मशीनच्या साहाय्याने हरभरा काढणी करत आहेत.मजूर टंचाई आणि बदलते हवामान यामुळे काढणीला वेग आला असून शेतात दिवसभर यंत्रांची लगबग पाहायला मिळत आहे.