सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अवकाळी पावसाने भात, भुईमूग, नाचणी शेतीचे मोठे नुकसान केले आहे. या व्यतिरिक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायती शेतीवर या अवकाळी पावसाचा परिणाम होणार आहे. जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या आंबा फळाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.