ठाण्यातील टेकडी बंगला पाचपाखाडी येथील यशोधन निवास सोसायटीच्या दोन घरांवरती झाड पडले आहे. यामध्ये घरांच्या छताचे पत्रे तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोणालाही दुखापत झालेली नाही. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कडून झाड बाजूला करण्याचे काम सुरू आहे.