मुसळधार पावसामुळे परशुराम घाट दाट धुक्याने व्यापला आहे. त्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून वाहनचालकांना दिवसा देखील हेडलाईट सुरू ठेवून संथ गतीने प्रवास करावा लागत आहे. घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.